Lok Sabha Election 2024 : सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते हायकमांडवर नाराज

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. यातील काँग्रेस 17 आणि सपा 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

96
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत

‘ऑल इज वेल दॅट एंड्स वेल’ या म्हणीनुसार सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती निश्चित केली असली तरी; हा शेवट काँग्रेससाठी सध्या तरी फारसा आनंददायी नाही. यूपीत सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते हायकमांडवर नाराज झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

‘ऑल इज वेल दॅट एंड्स वेल’ या म्हणीनुसार सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती निश्चित केली असली तरी; हा शेवट काँग्रेससाठी सध्या तरी फारसा आनंददायी नाही. यूपीत सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते हायकमांडवर नाराज झाले आहेत. अशात काँग्रेसपुढे राज्यातील नेते आणि कार्यकत्र्यांना समजावून सांगण्याचे संकट निर्माण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? असा प्रश्न ही नेते मंडळी करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)

महत्वाचा मुद्या असा की, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी फेकलेल्या जाळ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण अडकला आहे. सपाचे काँग्रेसवरील दबावतंत्र यशस्वी झाले आहे. कॉग्रेस आता आपल्याच पदाधिका—यांच्या दबावापुढे बॅकफूटवर आली आहे. कारण, यूपीतील काँग्रेसचे नेते ज्या जागांवर लढण्याची तयारी करीत होते त्या जागा काँग्रेसला देण्यास सपाने नकार दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार ‘ही’ कारवाई)

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. यातील काँग्रेस 17 आणि सपा 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवाय एक जागा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसला ज्या 17 जागा मिळालेल्या आहेत त्या जागांवर काँग्रेस कुणाला उभे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, काँग्रेस नेत्यांचे परंपरागत मतदारसंघ सपाच्या वाट्याला गेल्या आहेत. काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी निवडक जागा आपल्याकडे ठेवण्याची अट मांडण्याची मागणी हायकमांड केली होती. परंतु, सपाच्या दबावतंत्रापुढे काँग्रेस नेत्यांचे काहीही चालले नाही. (Lok Sabha Election 2024)

ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कसा बळकट होणार?
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची बलिया किंवा घोसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. कारण ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भूमिहार समाजाचा या मतदारसंघ्ज्ञात चांगला प्रभाव आहे. काँग्रेसनेही तसा प्रस्ताव दिला होता, पण सपाने ही जागा काँग्रेससाठी सोडली नाही. किंबहुना, काँग्रेसला आपल्या प्रदेशाध्यक्षासाठी सुध्दा एक जागा मिळविता आली नाही. याशिवाय फर्रुखाबादची जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, फैजाबादचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मल खत्री, रामपूरच्या माजी खासदार बेगम नूर बानो, लखनौचे माजी खासदार राज बब्बर आणि भदोहीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांच्यासाठी मागितली जात होती. सपाने यापैकी एकही जागा काँग्रेसला दिली नाही. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – ISROने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, सौरयान ‘आदित्य-एल वन’वरील PAPA पेलोड कार्यान्वित; वाचा सविस्तर…)

काँग्रेसला वरिष्ठांकडून नाराजीचे संकेत मिळाले
राजेश मिश्रा यांनी देखील एक्स वर पोस्ट केले आणि लिहिले की पक्षाप्रती समर्पण आणि नेतृत्वावरील निष्ठा यापेक्षा चाटुकारिता जास्त भारी पडली आहे. यावरून बड्या नेत्यांची नाराजी दिसून येते. आता प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना वाराणसीच्या जागेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अनिच्छेने लढावे लागणार असल्याचे मानले जात आहे. राज बब्बर यांना गाझियाबाद किंवा फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी दिली जाऊ शकते, परंतु इतर नेत्यांसाठी एकही जागा दिसत नाही.

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करून काँग्रेस हायकमांडला दबावात टाकले होते. आघाडी नाही झाली तरी सपा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे हे दाखवून यादव यांनी काँग्रेसला दबावात टाकले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.