Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार ‘ही’ कारवाई

200
Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार 'ही' कारवाई
Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार 'ही' कारवाई

हरियाणा (Haryana) पोलिसांनी आता शेतकरी आंदोलनातील नेत्यांवर कारवाई सुरू केलीय. या नेत्यांची बँक खाती गोठवून त्यांची मालमत्ता जप्त केली जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, 1984 आणि हरियाणा रिकव्हरी ऑफ डॅमेज टू प्रॉपर्टी ॲक्ट, 2021 अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवताना ही कारवाई केली जात आहे. (Farmers Protest)

(हेही वाचा – Manohar Joshi : शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले शिवसैनिक, नेते काळाच्या पडद्याआड – राज ठाकरे)

मालमत्ता जप्त करणार

आंदोलकांकडून सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आंदोलकांची बँक खाती गोठवून मालमत्ता जप्त केली जाईल. शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या केएमएमचे सदस्य आणि बीकेयू शहीद भगतसिंगचे अध्यक्ष अमरजीत मोहरी यांच्या घरी अंबाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. हिंसक आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान त्यांच्या मालमत्तेतून वसूल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.

परवानगीशिवाय आंदोलनात सहभागी झाल्यास अमरजीत सिंग मोहडी यांच्या मालमत्तेवर कारवाई

आंदोलनात अमरजीत सिंग मोहडी (Amarjit Singh Mohdi) यांची प्रमुख भूमिका असल्याचे नोटिशीत नमूद आहे. या नोटीसमध्ये न्यायालयाच्या आदेशांचा उल्लेख करण्यात आला आहे. आंदोलन आता हिंसक होत असून अशा परिस्थितीत आंदोलक सरकारी मालमत्तेचे नुकसान करू शकतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे परवानगीशिवाय आंदोलनात सहभागी झाल्यास मोहडीच्या मालमत्तेतूनही भरपाई केली जाऊ शकते.

शुभकरन सिंगच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत

एकीकडे हरियाणा (Haryana) पोलिस आंदोलकांवर कारवाई करीत असतानात पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारने खनौरी सीमेवर जखमी झाल्यामुळे मरण पावलेल्या शुभकरण सिंगच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतकाच्या बहिणीला शासकीय नोकरी दिली जाणार आहे. या आंदोलनातील नेत्यांनी शुभकरण सिंगला शहिद घोषीत करावे, अशी मागणी केली आहे. तोवर शुभकरणच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आलीय. शेतकरी नेते आज, शुक्रवारी काळा दिवस करीत आहेत. तर 26 तारखेला ट्रॅक्टर मार्च काढणार असून 14 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. (Farmers Protest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.