ISROने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, सौरयान ‘आदित्य-एल वन’वरील PAPA पेलोड कार्यान्वित; वाचा सविस्तर…

हे पेलोड अंतराळातील हवामान परिस्थितीचे निरीक्षण तसेच त्याचा पृथ्वीवरील प्रभाव दर्शवते.

121
ISROने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, सौरयान ‘आदित्य-एल वन’वरील PAPA पेलोड कार्यान्वित; वाचा सविस्तर...
ISROने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, सौरयान ‘आदित्य-एल वन’वरील PAPA पेलोड कार्यान्वित; वाचा सविस्तर...

भारताचे सौरयान ‘आदित्य-एल वन’ (ISRO Aditya L1 Mission) ने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवल्याची माहिती इस्रोने दिली आहे. या संदर्भातील पोस्ट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या अधिकृत “X” अकाऊंटवरून केली आहे. यामध्ये इस्रोने आदित्य-एल 1 वरील PAPA पेलोडमधील प्लाझ्मा विश्लेषक पॅकेजने 10-11 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या कोरोनल मास इजेक्शन्सचा (CMEs) सौर वारे प्रभाव शोधला असल्याचे म्हटले आहे. (ISRO Aditya L1 Mission)

पुढे इस्रोने म्हटले आहे की, सौरयान ‘आदित्य-एल वन’वरील PAPA पेलोड कार्यान्वित झाले आहे तसेच त्याने नाममात्रपणे आपली भूमिका पार पाडण्यास सुरुवात केली आहे. हे पेलोड अंतराळातील हवामान परिस्थितीचे निरीक्षण तसेच त्याचा पृथ्वीवरील प्रभाव दर्शवते. यानावरी PAPA पेलोड हे सौर पवन ऊर्जा आणि वस्तुमान विश्लेषक असल्याचेदेखील इस्रोने म्हटले आहे. (ISRO Aditya L1 Mission)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा सामना?)

यापूर्वी दोन वेळा कोरोनल मास इजेक्शन्सच्या (CMEs)घटना
‘आदित्य-एल वन’उपग्रह L1 बिंदूवर स्थिर असून, येथून ते निरीक्षण नोंदवत आहे. यापूर्वी PAPA ने संकलित केलेल्या डेटावरून, विशेषत: 15 डिसेंबर 2023 रोजी आणि 10-11 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोरोनल मास इजेक्शनच्या (CME) घटना घडल्या होत्या. 5 डिसेंबर 2023 दरम्यानच्या कालावधीत PAPA निरीक्षणांमध्ये एकूण इलेक्ट्रॉन आणि आयन संख्येत अचानक वाढ दिसून आली. हे वेळेतील फरक सौर पवन पॅरामीटर्स आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी (DSCOVR)आणि ॲडव्हान्स्ड कंपोझिशन एक्सप्लोरर (ACE)कडून मिळालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या मोजमापांशी जुळतात. याउलट, 10-11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत इलेक्ट्रॉन आणि आयनच्या संख्येत आढळून आलेली तफावत हे इलेक्ट्रॉन आणि आयनच्या वेळेतील फरकांसह अनेक किरकोळ घटनांचे परिणाम असल्याचे इस्रोने म्हटले आहे. (ISRO Aditya L1 Mission)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.