Lok Sabha Election 2024 : खडसेंच्या भाजपा एन्ट्रीमध्ये ओबीसी कार्डचे गणित

लोकसभेसह विधानसभेलाही होऊ शकतो फायदा

127
Lok Sabha Election 2024 : खडसेंच्या भाजपा एन्ट्रीमध्ये ओबीसी कार्डचे गणित

राज्यामध्ये मराठा आरक्षणामुळे मराठा मते आपल्यापासून कुठेतरी दूर होत आहेत आणि त्यातच आपल्या हक्काची असलेली ओबीसी मते ही आपल्याकडेच राहावीत याच उद्देशाने ओबीसींचे नेतृत्व करणारे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये पुन्हा घेण्याचा दिल्लीतील बड्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ खडसे हे तसे ओबीसीचे नेतृत्व करणारे बडे नेते आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांचा उत्तर महाराष्ट्रत मोठा प्रभाव देखील आहे. हे दिल्लीतील भाजपाच्या बड्या नेत्यांना बऱ्यापैकी माहित आहे. तसेच एकनाथ खडसे हे लोकसभा किंवा विधानसभा लढणार नाहीत परंतु त्यांचा फायदा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्कीच होईल असा कयास भाजपाकडून लावला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

एकेकाळी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या जोडीला एकनाथ खडसे हे ओबीसीचे राजकारण करत होते. भाजपावर असलेला भट ब्राह्मणांचा पक्ष हा शेरा दूर करण्यासाठी भाजपाच्या वतीने गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्गाला भाजपाच्या जवळ आणले. परंतु २०१९ च्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना तिकीट न देता त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी झालेल्या पराजयाचे खापर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोडत राष्ट्रवादीची वाट धरली होती. आता पुन्हा आपल्या स्वगृही एकनाथ खडसे परतत आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Meher Retreat : उन्हाळ्याच्या सुट्टीत मन रिफ्रेश करायचे आहे ? वाचा कसे आहे मेहेर रिट्रीट…)

पक्षांतर्गत विरोध बाजूला ठेवत विजय हाच महत्त्वाचा

राज्यातील भाजपाचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्याचा जरी विरोध असला तरी सध्या विजय महत्त्वाचा आहे आणि “आपकी बार चारसो पार” या नाऱ्याला सत्यात उतरवण्यासाठी जुने जाणते ओबीसी नेते आपल्यासोबत राहावेत हा एकमेव उद्देश दिल्लीतील नेत्यांनी विचारात घेऊनच केला असल्याचा दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024)

नुकसान भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न…

राज्यभरात मराठा आरक्षणावरून पेटलेले वातावरण कुठेतरी आपल्याला अडचणीचे ठरू शकते याची जाणीव भाजपा श्रेष्ठींना असल्यामुळेच पुन्हा एकदा आपले हक्काचे ओबीसी कार्ड खेळण्यावर भाजपाचा भर दिसत आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे किंवा मग छगन भुजबळ सारखे नेत्यांसाठी देखील उमेदवारीची घोषणा केली जात आहे. राज्यातील भाजपाच्या काही नेत्यांचा एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपामध्ये घेण्यास विरोध असला तरी खडसे हे मास लीडर असल्याकारणानेच भाजपाने त्यांच्यासाठी पक्षात जागा करून दिल्याचे देखील राजकीय जाणकार बोलून दाखवतात. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.