Jalna Lathi charge : ‘ते’ आदेश फडणवीसांचे नव्हते; माहिती अधिकारात आली माहिती समोर

103
Jalna Lathi charge : 'ते' आदेश फडणवीसांचे नव्हते; माहिती अधिकारात आली माहिती समोर
Jalna Lathi charge : 'ते' आदेश फडणवीसांचे नव्हते; माहिती अधिकारात आली माहिती समोर

अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे. (Jalna Lathi charge)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समूदायाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे राज्यभरातून संतापाची लाट निर्माण झाली. लाठीचार्जचा आदेश देणारे पोलिस आणि सरकारमधील मंत्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरली होती. त्यानंतर सरकारकडून काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. (Jalna Lathi charge)

(हेही वाचा : Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की? संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजपचा पलटवार)

फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते, असं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

(हेही वाचा :MSRTC चालकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी; महामंडळाचा नवा नियम)

म्हणून मागितली माफी

मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर टीका होऊ लागल्याने त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. लाठीचार्ज व्हायला नको होता, असं ते म्हणाले होते. लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला होता, असं फडणवीस म्हणाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.