Skill Development Center : महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र

मुंबई महापालिकेच्या ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेठ(नाना) चौकातील माध्यमिक शाळेत प्रायोगिक तत्वावर कौशल्य विकास केंद्र स्थापन केल्यानंतर आता महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये अशाप्रकारची केंद्र स्थापित केली जाणार आहेत.

13
Skill Development Center : महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र
Skill Development Center : महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र

मुंबई महापालिकेच्या ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेठ(नाना) चौकातील माध्यमिक शाळेत प्रायोगिक तत्वावर कौशल्य विकास केंद्र स्थापन केल्यानंतर आता महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये अशाप्रकारची केंद्र स्थापित केली जाणार आहेत. (Skill Development Center)

नाना चौक शाळेत प्रायोगिक तत्वावरील कौशल्य विकास केंद्र सुरु

मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्यांच्या विकासासाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातच कौशल्य विकास करण्यासाठी भारत सरकार व राज्य सरकारने पाऊले उचलेली आहेत. याचाच परिणाम म्हणून नवीन शैक्षणिक धोरण (NEP) मध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या संभाव्य अडी-अडचणी लक्षात घेण्याकरीता मुंबई महानगरपालिकेच्या जगन्नाथ शंकर शेठ(नाना) चौक या माध्यमिक शाळेमध्ये प्रायोगिक तत्वापथदर्शी तत्वावर कौशल्य विकास केंद्र सुरू रण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Skill Development Center)

तब्बल ६८ कोटी रुपयांचा खर्च

महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये २९४ कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी स्कील ट्री कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी केंद्रांसाठी ६७ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (Skill Development Center)

(हेही वाचा – MSRTC चालकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी; महामंडळाचा नवा नियम)

विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कामगारांनाही मिळणार प्रशिक्षण 

राज्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत आठ महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. त्यानंतर अतिशय कमी कालावधीत महानगरपालिकेच्या शाळेत मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास सोसायटी व मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून महानगरपालिकेच्या १९६ माध्यमिक शाळा मिळून २९४ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या केंद्रामध्ये केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर नाका कामगारांनाही कौशल्य शिक्षण-प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे कामगारांचे कौशल्य वाढून त्यांच्या रोजगारातही वाढ होणार आहे. (Skill Development Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.