MSRTC चालकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी; महामंडळाचा नवा नियम

123

MSRTC ची बस चालवताना मोबाईलवर बोलणे अथवा हेडफोन घालून गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे यावर आता महामंडळाने प्रतिबंध केला आहे. एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाजमाध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी (MSRTC) वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.

(हेही वाचा Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की? संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजपचा पलटवार)

काय म्हटले आहे नियमावलीत? 

  • रा.प. बस/वाहन चालवित असतांना चालकांनी आपला भ्रमणध्वणी वाहकाकडे देण्यात यावा.
  • विनावाहक फेरीवरील चालकांनी वाहन चालवितांना आपला भ्रमणध्वणी आपल्या बॅगमध्ये ठेवावा.
  • चालक वाहन चालवित असताना हेडफोन आणि Bluetooth इत्यादी उपकरणाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
  • सदर सूचना ही भाडेतत्वावरील चालकांना देखील बंधनकारक राहील सबब विभागांनी आपल्या विभागाच्या अखत्यारीतील भाडेतत्वावरील वाहनपुरवठादार कंपनी यांना अवगत करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.