Lok Sabha Election 2024 : डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘या’ तारखेला कल्याणमध्ये सभा 

महायुतीच्या उमेदवारांकरीता पंतप्रधान मोदी कल्याणनगरीत येणार

113
Lok Sabha Election 2024 : डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘या’ तारखेला कल्याणमध्ये सभा 

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पहिल्या टप्प्याचे १९ एप्रिल रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे २६ एप्रिल रोजी झाले. उर्वरित तीन टप्प्यांचे मतदान अजून बाकी आहे. दोन्ही टप्प्यातील मतदानात काही ठिकाणी उत्साहात तर काही ठिकाणी मतदानाचा निरुत्साह पाहायला मिळाला. दरम्यान, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांकरीता येत्या १० मे राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची जाहिर प्रचार सभा होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Krishnaswamy Sundararajan: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख कोण? जाणून घ्या)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील (Bhiwandi Lok Sabha candidate Kapil Patil) व कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे (Kalyan Lok Sabha candidate Dr. Shrikant Shinde) यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहेत. ही सभा कल्याण पश्चिमेला घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाकडून जाहीर करण्यात आली. मात्र सभेची वेळ व ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi: वायनाड जिंकण्यासाठी काँग्रेसने पीएफआयची मदत घेतली, पंतप्रधान मोदींचा घणाघात )

खासदार कपिल पाटील म्हणाले की, देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी जाहिर सभा घेत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. हा झंझावात कल्याणमध्येही १० मे (kalyan 10th May) रोजी पाहण्यास मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली कल्याणच्या फडके मैदानात जाहीर सभा झाली होती.  (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.