Mumbai-Pune Express Way वर २१ नोव्हेंबरला ब्लॉक

13

Mumbai-Pune Express Wayवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहे. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा MSRTC चालकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी; महामंडळाचा नवा नियम)

Mumbai-Pune Express Way वर विविध ठिकाणी ग्रँटी बसविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा विशेष ब्लॉक घेतले जात आहे. उद्या देखील दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.