ठाकरेंना पुन्हा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवंगत आमदार गोरे कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश

98

काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचे निष्ठावंत नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात होता. या घटनेला काही दिवस होताच आता पुन्हा एकदा ठाकरेंना दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या कुटुंबियांनी धक्का दिला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश गोरे, त्यांचे बंधू नितीन गुलाब गोरे यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांच्यासोबत स्थानिक स्तरावरील अनेक जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी रात्री हा पक्षप्रवेश झाला.

दरम्यान कोरोनाच्या काळात शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाले होते. गोरे यांच्या पत्नी आणि बंधू हे सध्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड सदस्यपदी कार्यरत आहेत. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोणी-कोणी प्रवेश केला?

जिल्हा परिषद सदस्य रुपाली श्रीकांत कड, अॅड विजयसिंह बाबासाहेब शिंदे, सभापती दत्ताशेठ भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य मचिंद्र गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती काळूरामशेठ कड, खेड तालुका अध्यक्ष बिपिनशेठ रासकर, चाकण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगलताई गोरे, स्नेहलताई जगताप चाकण, नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय गोरे, अॅड प्रकाश लक्ष्मण गोरे, ऋषिकेश झगडे, नगरसेवक निलेश बबन गोरे, प्रविण शांताराम गोरे, सुजाताताई मंडलिक, महेश मोरेश्वर शेवकरी, नयनाताई झनकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष माऊली चिमाजी सातकर, भगवान पोखरकर, राजू जवळेकर अशोक भुजबळ इत्यादींनी शिवसेनेत प्रवेश केला.

(हेही वाचा – राऊतांनी धमकी दिल्याने, जीवाला धोका असल्याचे आमदारांनी सांगितले, म्हणूनच बहुमत चाचणीचे आदेश; तुषार मेहतांचा युक्तिवाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.