पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात; बनावट पासपोर्ट जप्त

101

पुण्यातून एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या वास्तव्य करणा-या या तरुणाला विशेष गुन्हे शाखेने पकडले आहे. तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे.

मोहम्मह अमान अन्सारी ( वय 22) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अन्सारीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पासपोर्ट कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

( हेही वाचा: HSC Paper Leak Case: बारावीचा फुटलेला पेपर घेणारे 119 विद्यार्थी सापडले )

 अन्सारीची कसून चौकशी 

अन्सारीचा बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, तसेच, तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.

पुण्यात बेकायदाशीररित्या वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण महम्मद अन्सारी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवले आहे. त्याने पुणे ते दुबई प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले असून, अटकेत असलेल्या अन्सारीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.