समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! दोन ट्रकची धडक, एकाचा मृत्यू

96

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धी महामार्गावर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून यात ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका! कोरोना काळातील १८ महिन्यांच्या ‘डीए’बाबत सरकारने घेतला मोठा निर्णय)

जखमींना केले रुग्णालयात दाखल 

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. दरम्यान आता आणखी एक भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे. कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दुसऱ्या एका ट्रकसोबत अपघात झाला. यात कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही ट्रकला समृद्धी महामार्गावरून क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढावे लागले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील बचाव पथकाने धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.