Kirit Somaiya : कोविडकाळात उद्धव सेनेने केला १३२ कोटींचा खिचडी घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई पोलिसांनी आता कोविड खिचडी घोटाळ्यावर गुन्हा नोंदवला आहे.

35
Kirit Somaiya : कोविडकाळात उद्धव सेनेने केला १३२ कोटींचा खिचडी घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya : कोविडकाळात उद्धव सेनेने केला १३२ कोटींचा खिचडी घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

‘कोविड म्हणजे कमाईचे साधन, हे ध्येय उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांचे होते, हे आता सिद्ध होत आहे. कोविड कफन घोटाळा, कोविड हॉस्पिटल घोटाळा, कोविड हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट घोटाळा, रेमडीसीवर घोटाळ्यापाठोपाठ आता उद्धव सेनेने १३२ कोटींचा खिचडी घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे’, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले, मुंबई पोलिसांनी आता कोविड खिचडी घोटाळ्यावर गुन्हा नोंदवला आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल २०२० ते जुलै २०२० च्या दरम्यान गरीब कामगारांना जेवणाची व्यवस्था म्हणून खिचडी पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट पन्नास कंत्राटदारांना देण्यात आले. महापालिकेने १३२ कोटींचे पेमेंट केले असल्याचे पुरावे व तक्रार मी मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि कंपनी मंत्रालयकडे केली होती.

मुंबई महापालिकेने खिचडी घोटाळ्या संबंधात काही आठवड्यापूर्वी प्रिलिमिनरी इन्क्वायरी (PE) हि नोंदवण्यात आली होती. या पन्नास कॉन्ट्रॅक्ट्रर पैकी अनेक कॉन्ट्रॅक्ट्रर हे फक्त कागदावर होते. काही हजारांचे खिचडी फूड पॅकेट पुरवल्यानंतर लाखो खिचडी पॅकेटचे बोगस बिल या कॉन्ट्रॅक्ट्ररने केले असल्याचे पुरावेही मी दिले आहेत, असे सोमय्या म्हणाले.

(हेही वाचा – Pune Lok Sabha Constituency : लोकसभेला पुण्यातून सुनील देवधर यांना उमेदवारी?)

असा झाला घोटाळा….
  • कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना अटक झाली. सुजित पाटकर यांना खिचडी घोटाळ्यातही लाखो रुपये मिळाले आहे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर आणि त्यांचे पार्टनर राजीव साळुंखे यांच्या सह्याद्री रिफ्रेशमेंटला ही सुमारे सव्वा आठ कोटी महापालिकेने खिचडी कॉन्ट्रॅक्टचे दिले.
  • या व अन्य कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातून उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या मित्रपरिवाराच्या खात्यात पैसे गेले आहेत. संजय राऊत यांचे मित्र व परिवाराच्या बँकेच्या खात्यात पैसे गेले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या मित्र/सहयोगी यांच्याही बँक खात्यात खिचडीचे पैसे गेले आहेत, असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.