Ganeshotsav : मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांमुळे शनिवार-रविवार गर्दीने रस्ते गजबजणार

४०हून अधिक गणेश मंडळांचा आगमन सोहळा

111
Ganeshotsav : मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांमुळे शनिवार-रविवार गर्दीने रस्ते गजबजणार
Ganeshotsav : मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांमुळे शनिवार-रविवार गर्दीने रस्ते गजबजणार

गणपतीचे आगमन काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असलेले लालबाग-परळ,करीरोड येथून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती मुंबई व मुंबईबाहेर रवाना होणार आहेत. गणेशमूर्ती घेऊन जाताना होणारी भाविकांची मोठी गर्दी आणि वाहतूककोंडी लक्षात घेता परळमधील गौरीशंकर ते लालबागजवळील चिंचपोकळी परिसरापर्यंत वाहतूक एकमार्गी करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
यंदा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेशमूर्ती २५ फुटांहून अधिक उंच आहेत. शनिवारी दहाहून अधिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती गणेशशाळेतून मंडपाकडे नेण्यात येणार आहेत. तसेच रविवार, ३ सप्टेंबर रोजी तब्बल तीसहून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळेतून बाहेर पडणार आहेत.

हा आगमन सोहळा पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतून हजारो गणेशभक्त लालबाग-परळमध्ये दाखल होतील असा अंदाज आहे. गणेशमूर्ती घेऊन जात असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना भक्तांच्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. त्याबरोबरच विभागातील स्थानिक नागरिकांनाही वाहतूककोंडीचा त्रास होतो. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सव मंडळे खबरदारी घेत आहेत.रात्री १० वाजण्याच्या अगोदर गणेशमूर्ती मंडपात दाखल होईल. आगमन मार्गावर मंडळाचे तब्बल तीनशे कार्यकर्ते आळीपाळीने पोलिसांना सुरक्षिततेसाठी सहकार्य करणार आहेत अशी माहिती गणेशोत्सव मंडळांच्या वतीने देण्यात येत आहे.

(हेही वाचा :Fishes Died : भाविकांनी तलावात टाकलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने हजारो माशांचा मृत्यू)

वाहतुकीत होणार बदल?
शनिवार, रविवारपासून मंडळांच्या मंडपात गणपतीबाप्पांचे आगमन होत आहे. या आगमन सोहळ्यांचा वाहतूक यंत्रणेवर परिणाम होऊ नये, यासाठी या दिवशी दोन्ही दिशेने जाणारी वाहने लालबागचा राजा सिग्नलपासून आयटीसी हॉटेलपर्यंत एकच, अशोका टॉवरच्या बाजूने चालविण्यात यावीत व श्रॉफ बिल्डिंग ते तेजुकाया, भारतमाता, परळ वर्कशॉप हा मार्ग फक्त गणेशमूर्तीच्या आगमनासाठी रिकामी ठेवण्यात यावा, एकाच मार्गिकेवर गर्दी आणि वाहतूककोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, भायखळा येथून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून बस अथवा अवजड वाहनांना प्रवासासाठी परवानगी देऊ नये, त्यांची वाहतूक रे रोड, कॉटनग्रीन, चार रस्ता मार्गे वळविण्यात यावे, तसेच रेडिओ, माध्यमे, एक्सच्या माध्यमातून लोकांना याची माहिती देण्यात यावी, बांधकामाच्या वाहनांना सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत परवानगी देऊ नये अशा अनेक सूचना समितीने पोलिसांना केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.