इराणचे सर्वोच्च नेते Ayatollah Khamenei यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू; रशिया आणि चीनने व्यक्त केला तीव्र संताप 

115
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भाषण देत आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भाषण देत आहेत.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात (Air strikes) इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Khamenei Death) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संमिश्र देशांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असून रशिया आणि चीनसारख्या देशांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. (Ayatollah Khamenei)

(हेही वाचा – China Visa Free Entry : चीनची मोठी खेळी! ५० देशांसाठी व्हिसाची कटकट संपली; पाकला ‘नो एन्ट्री’, भारताचा समावेश?)

चीन आणि रशियाचा अमेरिकेवर निशाणा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला आहे. चीनने म्हटले आहे की, खामेनी यांच्यावर झालेला हा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे गंभीर उल्लंघन आहे. हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांना पायदळी तुडवणारे कृत्य असून यामुळे जगातील शांतता धोक्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी देखील याला ‘निर्दयी हत्या’ असे संबोधले असून ही कारवाई मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – मध्य-पूर्वेतील युद्धामुळे कराची-लाहोर-इस्लामाबाद जळत आहे…Pakistan मधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर )

उत्तर कोरियाची संतप्त प्रतिक्रिया

उत्तर कोरियाने (North Korea) देखील या लष्करी कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इराणवरील हा हल्ला बेकायदेशीर असून ते एका राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर केलेले आक्रमण आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण झाली असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणमध्ये आता ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.