भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

126

भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना खलिस्तानी दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संदीप सिंग नावाच्या खलिस्तानी व्यक्तीने तिवाना आणि कुटुंबीयांना ही धमकी दिली आहे.

( हेही वाचा : दिल्लीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात केंद्र )

लष्कराकडून पुष्टी केल्यावर असे आढळून आले की, पंजाब भाजपाशी संबंधित अनेक नेत्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी एका खलिस्तानी दहशतवाद्याने भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या मेसेजमध्ये तेजिंदरसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.

स्वत:ला लष्कर-ए-खालसाचा प्रवक्ते म्हणवून घेणाऱ्या संदीप सिंग यांनी लिहिलेल्या संदेशात, ‘भाजप सोडा नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मारले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या घरातून बॉम्ब आढळल्याचे ऐकले, आता लष्करी तळाजवळ दुसरा बॉम्ब ठेवण्यात आला आहे.’ या धोक्यामुळे पंजाबमधील लष्करी तळावरही सुरक्षा बळकट करण्यात आली आहे. इतकेच नाही तर तेजिंदरसह भाजप, आरएसएसचे अनेक मंत्री आणि भारतीय लष्कराला लक्ष्य करण्याच्या धमक्या या मेसेजमध्ये देण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप संदेशात काय?

तेजिंदर सिंग तिवाना यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगभर नावलौकिक मिळवत आहे. ते देशविरोधी शक्तींना सहन होत नाही. आज मला व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश आणि कॉल आले आहेत. त्यात माझ्यासह आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. स्वत:ला लष्कर खालसाचा प्रवक्ता म्हणवून घेणाऱ्या संदीप सिंग खलिस्तानी याच्या वतीने हे संदेश पाठवण्यात आले आहेत. एका संदेशात या देशद्रोही, हिंदुत्वविरोधी व्यक्तीने भाजप नेते, आरएसएस पदाधिकाऱ्यांसह भारतीय लष्करावर हल्ला करण्याची धमकीही दिली आहे.मी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.