Kangana Ranaut : काँग्रेसची कंगना राणौतवर अश्लील टिप्पणी; राष्ट्रीय महिला आयोगाचे निवडणूक आयोगाला पत्र

भाजपाने हिमाचलप्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबुक आणि इन्स्टा खात्यावरून कंगनाचा एक अश्लील फोटो पोस्ट करून त्यावर खालच्या पातळीची टीका केली. या फोटोवरून आता सोशल मीडियावर रान उठलं असून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे.

191
Kangana Ranaut : काँग्रेसची कंगना राणौतवर अश्लील टिप्पणी; राष्ट्रीय महिला आयोगाचे निवडणूक आयोगाला पत्र

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपाच्या लोकसभा उमेदवार कंगना राणौतचा (Kangana Ranaut) अश्लील फोटो ट्विट करत काँग्रेसने खालच्या पातळीवरील टिप्पणी केली होती. त्यावर टीका होऊ लागल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. दरम्यान हा फोटो शेअर करणाऱ्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कंगना राणौत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

(हेही वाचा – Muslim Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून हल्ला)

भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जुंपली :

भाजपाने हिमाचलप्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबुक आणि इन्स्टा खात्यावरून कंगनाचा एक अश्लील फोटो पोस्ट करून त्यावर खालच्या पातळीची टीका केली. या फोटोवरून आता सोशल मीडियावर रान उठलं असून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. (Kangana Ranaut)

(हेही वाचा – भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKP ची भारताला धमकी)

माझ्या नावाचा गैरवापर होत आहे :

सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणौत (Kangana Ranaut) यांचा एक अर्धनग्न फोटो पोस्ट करून “आजकल मंडी मे क्या रेट है..?” असे म्हणत अश्लील टीप्पण केली होती. या प्रकारानंतर भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी जोरदार आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांनी अश्लील पोस्ट डिलीट करत आपण ही पोस्ट केली नसल्याचा खुलासा केला. याबाबत काँग्रेस नेत्या म्हणाल्या की, माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम खात्याचा गैरवापर करून एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मला ओळखण्याऱ्यांना माहित असेल की मी स्त्रियांबाबत असे कधीच करणार नाही. माझ्या नावाचा गैरवापर करणारे पॅरोडी (Kangana Ranaut) खातेही सुरू असून यातून संपूर्णपणे गैरप्रकार सुरू आहे. याबाबत तक्रार केल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे.

(हेही वाचा – IPL 2024, RCB vs PBKS : ‘विराट’ खेळीतून साकारला बंगळुरू संघाचा विजय )

कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली…

अशातच आता काँग्रेसकडून झालेल्या अश्लील शेरेबाजीला कंगना राणौतने (Kangana Ranaut) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कंगना म्हणाली की, “कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. राणीमधील एका भोळ्या मुलीपासून ते धाकडमधील मोहक गुप्तहेरपर्यंत, मणिकर्णिकामधील देवीपासून चंद्रमुखीतील राक्षसापर्यंत, रज्जोमधील वेश्येपासून थलाईवीतील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. तसेच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या कामगारांचा अशाप्रकारे अपमान करणे थांबवले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र असल्याचे कंगनाने (Kangana Ranaut) म्हंटले आहे.

(हेही वाचा – ST Buses : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा एसटी महामंडळाला फटका; प्रवाशांची गैरसोय)

राष्ट्रीय महिला आयोगाचे निवडणूक आयोगाला पत्र :

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) भारतीय निवडणूक आयोगाला (ईसीआय) पत्र लिहून काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि पक्षाचे नेते एच. एस. अहिर यांच्यावर अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) विरोधात सोशल मीडियावर ‘अश्लील आणि अपमानास्पद’ पोस्ट केल्याबद्दल ‘कठोर कारवाई’ करण्याची मागणी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.