Mumbai Crime : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून १लाखात विकले, चार महिलांना अटक

163
Mumbai Crime : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून १लाखात विकले, चार महिलांना अटक
Mumbai Crime : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून १लाखात विकले, चार महिलांना अटक

भांडुप येथून एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून ठाण्यातील दोन महिलांना एक लाख रुपयांना विकल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी सोमवारी दोन महिलांना अटक केली. मुलीला विकत घेतलेल्या महिला सोमवारी राजस्थानला पळून जाण्याचा विचार करत होत्या. त्यांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai Crime)

(हेही वाचा- भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKP ची भारताला धमकी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची मुलगी रविवारी संध्याकाळी तिच्या घराबाहेर होळी साजरी करत असताना तिच्या शेजारी राहणारी खुशबू गुप्ता (Khushboo Gupta) (१९ ) हिने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेली. (Mumbai Crime)

त्यानंतर खुशबूने जवळच राहणारी तिची साथीदार मैना दिलोड (Maina Dilod) (३९) हिच्याशी संपर्क साधला. दोघांनी मुलीला ऑटोरिक्षात बसवून ठाण्यात घेऊन गेले,तिथे रविवारी रात्री दोघीनी मुलीला ठाण्यात राहणाऱ्या पायल शाह आणि दिव्या सिंग या बारबालाकडे सोपवले. (Mumbai Crime)

(हेही वाचा- Muslim Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून हल्ला)

दरम्यान, पाच वर्षांच्या चिमुरडीचे पालक तिचा शोध घेत असताना एका स्थानिक रहिवाशाने त्यांना खुशबूसोबत बघितल्याचे सांगितले . “पालकांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली.भांडुप पोलिस (Bhandup Police) ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुशबू गुप्ताचा कॉल डेटा रेकॉर्ड तपासला असता  खुशबूच्या लोकेशनची माहिती मिळाली. तिला भांडुप येथून अटक करण्यात आली होती,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai Crime)

चौकशीदरम्यान तिने मैनाची भूमिका उघड केली आणि पुढे सांगितले की पायल आणि दिव्याने मुलीला १ लाख रुपयांना विकत घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. पायल आणि दिव्या यांनी पोलिसांना सांगितले की ते एका बारमध्ये गायक म्हणून काम करतात आणि ठाण्यातील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यांनी नात्यात असल्याचा दावा केला होता आणि त्यांना मूल वाढवायचे होते. (Mumbai Crime)

(हेही वाचा- IPL 2024 Players List : २०२४ च्या हंगामात आयपीएलमध्ये कुठला संघ आहे कागदावर बलवान? )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल आणि दिव्या सोमवारी मुलीला राजस्थानला घेऊन जाण्याचा कट रचत होते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की ते मुलीला दुसऱ्याला विकण्यासाठी राजस्थानला जात होते की इतर हेतू होते. (Mumbai Crime)

पोलिसांनी चार महिलांवर आयपीसीच्या कलम ३६३ (अपहरण), ३७० (व्यक्तींची तस्करी) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.