Holi : मुंबईसह तीन शहरात होळी निमित्त वाहन चालकांवर कारवाई 

295
Holi : मुंबईसह तीन शहरात होळी निमित्त वाहन चालकांवर कारवाई 
Holi : मुंबईसह तीन शहरात होळी निमित्त वाहन चालकांवर कारवाई 
होळीच्या (Holi) दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विशेषत: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सोमवारी मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ४०३ वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Holi)
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जारी केलेल्या आकडेवारीनुसार , वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याबद्दल १२४ जणांवर कारवाई केली तर४५९३ जणांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ४२९ जणांवर ट्रिपल सीट प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. (Holi)
एका अधिकाऱ्याने सांगितले, “शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी यासाठी आम्ही शहराचे पोलीस कर्मचारी  तैनात केले होते.” (Holi)
ठाणे पोलीस (Thane Police) अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १७४ जणांवर कायदेशीर कारवाई केली, ६६३  जणांवर ट्रिपल सीट चालवल्याबद्दल आणि १,५४२जणांना हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. परवानगीपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३६५ रिक्षाचालकांवर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Holi)
पोलीस उपायुक्त विनय राठोड (Vinay Rathore) (वाहतूक) म्हणाले, “आम्ही ठाणे आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या भागात कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. (Holi)
दुसरीकडे नवी मुंबई पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून विशेष मोहीम राबवली आहे. सोमवारी नवी मुंबई पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल केले आहेत. (Holi)
ही विशेष मोहीम मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Holi)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.