ED: के. कविता यांनी ‘आप’ला शंभर कोटी दिल्याचा ईडीचा दावा

तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि आमदार असलेल्या के. कविता यांना 'ईडी'ने मागील आठवड्यात हैदराबाद येथून अटक केली.

295
ED: के. कविता यांनी 'आप'ला शंभर कोटी दिल्याचा ईडीचा दावा

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता आणि इतरांनी दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणातून फायदा मिळविण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संगनमत करत ‘आप’ला शंभर कोटी रुपये दिले, असा आरोप सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी केला.

तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि आमदार असलेल्या के. कविता यांना ‘ईडी’ने मागील आठवड्यात हैदराबाद येथून अटक केली असून न्यायालयाने त्यांना २३ मार्चपर्यंत ताब्यात ठेवण्याची परवानगी ‘ईडी’ला दिली आहे.

(हेही वाचा – प्रकाश आंबेडकर ‘इंडि’ आघाडीत फूट पाडणार? ‘फ्युचर इंडिया’आडून DMK ला केले जातेय लक्ष्य! )

कविता आणि इतर काही जणांनी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या इतर नेत्यांशी हातमिळवणी करत दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाचा लाभ घेतला आणि त्या बदल्यात या नेत्यांना शंभर कोटी रुपये दिले, असे तपासात उघड झाला असल्याचा दावाही ईडीने केला आहे.

दरम्यान, मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स बजावले आहे. असून त्यांना अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास यंत्रणेने त्यांना २१ मार्च २०२४ रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.