Indian Navy: भारत-अमेरिका यांच्या संयुक्त सरावाला प्रारंभ

128
Indian Navy: भारत-अमेरिका यांच्या संयुक्त सरावाला प्रारंभ
Indian Navy: भारत-अमेरिका यांच्या संयुक्त सरावाला प्रारंभ

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान 18 ते 31 मार्च या कालावधीत टायगर विजय-24 या द्विपक्षीय आणि तिन्ही सेनादलांचा सहभाग असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) सराव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय आणि अमेरिकन सैन्याने सोमवारी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) ऑपरेशन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी टायगर ट्रायम्फ-24 या तिन्ही सेवांच्या सरावाला सुरुवात केली, असे भारतीय नौदलाने सोमवारी सांगितले. विशाखापट्टणम किनाऱ्यावर या कवायती होणार आहेत.

भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स (Helicopters of Indian Navy) आणि लँडिंग विमानांसह सुसज्ज जहाजे, भारतीय लष्कराचे सैनिक, वाहने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने, हेलिकॉप्टर्स यांच्यासह शीघ्र कृती वैद्यकीय पथक (आरएएमटी) देखील या सरावात सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाच्या जहाजांवर तैनात अमेरिकी मरीन कोअरची पथके तसेच अमेरिकेच्या लष्करातील सैनिक अमेरिकेतर्फे या सरावात सहभागी होणार आहेत. एचएडीआरविषयक कारवायांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांदरम्यान आंतरपरिचालन क्षमता विकसित करणे तसेच दोन्ही देशांच्या सेनादलांमध्ये जलद आणि विनाअडथळा समन्वय शक्य करण्यासाठी प्रमाणित परिचालन पद्धती (एसओपीज)ला अधिक उत्तम स्वरूप देणे हा या सरावाचा उद्देश आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी १८ खासदार विजयी करून दाखवावे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आव्हान)

मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण
सरावाचा बंदर परिसरातील टप्पा 18 ते 25 मार्च 2024 या कालावधीत पार पडेल. दोन्ही देशांच्या नौदलांतील कर्मचारी प्रशिक्षणपर भेटी, विषयानुरूप तज्ञांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक परिसंवाद या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. बंदराच्या ठिकाणचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सेनादलांची पथके तैनात करून ही जहाजे समुद्रातील टप्पा पूर्ण करण्यासाठी निघतील आणि तेथील परिस्थितीनुसार सागरी, जमिनीवरील तसेच समुद्रातील अशा दोन्ही प्रकारची मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) कार्ये हाती घेतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.