I.N.D.I.A. Alliance : बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना हव्यात २२ जागा

जेडीयू आणि राजदने ठेवला डोक्यावर हात

77
I.N.D.I.A. Alliance : बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना हव्यात २२ जागा
I.N.D.I.A. Alliance : बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना हव्यात २२ जागा

‘इंडिया’ नावाच्या आघाडतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरून नाराजीच्या घटना हनुमानाच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नीतीश कुमार यांच्यावर दबावात घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची जवळीक वाढत असल्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची ओळख करून देत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

कदाचित म्हणूनच की का, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या पदरात जादा जागा पाडून घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. डाव्या पक्षांनी १५ आणि काँग्रेसने सात अशा २२ जागांवर आपला दावा ठोकला आहे. अर्थात, हे दोन्ही पक्ष २२ जागांवर आपले उमेदवार उभे करतील. इंडियाची तिसरी बैठक अलिकडेच मुंबईत संपन्न झाली आणि त्यातच जागा वाटपाच्या मुद्यांवर चर्चा सुरू करण्याचे ठरले होते. यानुसार, देशपातळीवर जागा वाटपावर चर्चा सुरू होताच विरोधी पक्षांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.

लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असलेले बिहार हे देशातील तिसरे राज्य होय. येथे ४० जागा आहेत. डाव्या पक्षांनी १५ जागांवर आपला दावा केला आहे. यात सीपीआय (एमएल) ने नऊ, माकपाने चार आणि सीपीआयने दोन जागांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे डाव्यांनी अशा जागांवर दावा केला आहे जेथे आता जेडीयू आणि राजदचे आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसने नऊ जागांवर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेसने सुध्दा जेडीयूचे आमदार आहेत त्या जागांवर दावा ठोकला आहे.

(हेही वाचा – MUTP project : एमयुटीपी प्रकल्पासाठी जीएसटीच्या अनुदानातून ९५० कोटींची रक्कम होणार वळती)

दरम्यान, नीतीश कुमार यांचा जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा राजद प्रत्येक १६ जागांवर लढणार आहेत, अशी चर्चा आहे. दोन्ही पक्ष या मतांवर ठाम राहिले तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी फक्त आठ जागा उरतात. उर्वरित आठ जागांपैकी पाच काँग्रेस आणि तीन जागा डाव्यांना मिळतील. सध्या, बिहारमध्ये भाजपचे १८, लोकजनशक्ती पक्षाचे सहा, संयुक्त जनता दलाचे १५ आणि काँग्रेसचा एक खासदार आहे. आणि चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा एकही खासदार नाही. २०१९ च्या निवडणुकी त्यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत जागा वाटपांची चर्चा सुरू आहे. थोडक्यात, नीतीश कुमार यांच्या दादागिरीपुढे नमते घेण्यापूर्वीच काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपले फासे फेकले आहेत. सर्व पक्ष आपल्या मागणीवर अडून बसले आहेत. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत इंडियात फूट पडल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.