Farmer suicide : शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, मराठवड्यात एकाच दिवशी 3 आत्महत्या

145
Farmer suicide : शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, मराठवड्यात एकाच दिवशी 3 आत्महत्या
Farmer suicide : शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, मराठवड्यात एकाच दिवशी 3 आत्महत्या

देशाचा कणा असलेला शेतकरी यंदा पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा वेग प्रचंड वाढला असून, गेल्या आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक मानला जात आहे.

मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. म्हणजेच दिवसाकाठी 2 ते 3 शेतकरी आत्महत्या होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता, मात्र आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. अंगावर शहारे आणणारा हा आकडा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक असल्याची माहिती समोर येत आहे,तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

आत्महत्येमुळे चिंता वाढली…
दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यात 1 हजार 22 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती.असे असताना यावर्षी 8 महिन्यांतच 685 वर जाऊन पोहोचला आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.दोघांनी विष प्राशन करून, तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (48),फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (55) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर (43), अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.