ठाण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन स्थगित

107
ठाण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन स्थगित

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (२७ जुलै रोजी) सायंकाळी ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबई, ठाणे परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम आज स्थगित करण्यात आला आहे.

ठाण्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाचे नेते व कार्यकर्ते नागरिकांच्या मदतकार्यात व्यस्त राहणार असल्यामुळे उदघाटनसोहळा पुढे ढकलण्यात येत असल्याचे, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा लवकरच आयोजित होईल, अशी माहितीही पक्षातर्फे देण्यात आली.

जितेंद्र आव्हाड एकाकी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यातून समर्थन मिळू लागले आहे. शरद पवार यांची साथ देणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. त्याचबरोबर काही माजी नगरसेवकही त्यांना समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आव्हाड हे एकाकी पडले असून त्यांच्यापुढे पक्ष टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू)

आज (गुरुवार २७ जुलै) मुंबई शहराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशातच ठाण्यातही पावसाची संततधार सुरु असल्याने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील इतर भागातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.