Gunaratna Sadavarte: मनोज जरांगेंना नैराश्य आलंय, गुणरत्न सदावर्तेंनी केली कडाडून टीका

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली आहे. राज्यपालांची सही नाही, तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगेंना लक्ष्य केले आहे.

152
मनोज जरांगेंकडे Maratha समाजाची पाठ

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या. त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. मनोज जरांगे दादागिरी करत आहेत, असा हल्लाबोल करत गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. सलाईन नाही लागली, तर उपोषण नाही असे म्हणत सदावर्तेंनी जरांगेंच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली आहे.

जरांगे कोण आहे? ते काय दादा झाले आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंवर त्यांच्याच जवळचा सहकारी अजय बरासकर यांच्याकडून गंभीर आरोप; जरांगे फसवणारा )

या पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर आरोपही केला आहे. ते म्हणाले की, नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत. त्यांनी असे करू नये. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. यापूर्वीही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करून मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरू पाहात होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करून अशा प्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे. मनोज जरांगे मुंबईकडे येत असताना १४९ची नोटिस निघाली होती. मी दाखल केलेल्या याचिकेनंतरच ती नोटीस जारी करण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली आहे. राज्यपालांची सही नाही, तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगेंना लक्ष्य केले आहे.

तसेच मनोज जरांगे नैराश्यात आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. आंतरवालीत जखमी झालेल्यांना पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी करून जरांगेंवर हल्लाबोल केला.

सदावर्तेंचा जरांगेंना सल्ला…

मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आता राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं १० टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS (Economically Backward Class) आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारतात त्याचा लाभ घेता, तुम्हाला दुसरं इतर कोणतही आरक्षण घेता येत नसल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये, असा सल्लाही सदावर्तेंनी जरांंगेंना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.