Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंवर त्यांच्याच जवळचा सहकारी अजय बारसकर यांच्याकडून गंभीर आरोप; जरांगे फसवणारा

413

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विधिमंडळात १० टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला. परंतु त्यावर नाराजी व्यक्त करत सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. मात्र आता त्यांच्यावर त्यांचेच जवळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आंदोलनात फूट पडल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले बारसकर? 

  • जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे आहेत.
  • जरांगे हेकेखोर माणूस आहे. रोज पलटी मारतात. जरांगेंची  (Manoj Jarange Patil) भूमिका पारदर्शक नाही. लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. जरांगें सरकारला निवेदन देत नाहीत
  • सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला.

(हेही वाचा Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको; २४ फेब्रुवारीपासून दररोज मराठा आरक्षणाचे आंदोलन)

  • जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर JCB फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देते?
  • 10 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरु करणार हे समाजाला सांगितले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी मराठा बांधवांना जरांगेंनी विश्वासात घेतले नाही.
  • जरांगेची  (Manoj Jarange Patil) दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली. जरांगेनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली.
  • लक्ष कसं वेधून घेता येईल हे जरांगेला चांगलं माहित आहे. TRP मिळवण्यासाठी मुद्दाम तो पत्रकारांसमोर लोकांची मिडियाची फसवणुक होईल अशा भाषेत बोलतो. जरांगेची भाषा शिवराळ आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.