Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको; २४ फेब्रुवारीपासून दररोज मराठा आरक्षणाचे आंदोलन

159

मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) विधेयक राज्याच्या विधीमंडळात विशेष अधिवेशनत समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. कुणबी आणि मराठा एकच आहे, असा अध्यादेश काढा, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे गावे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा केल्या. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. हे आंदोलन दररोज असणार आहे.

कसे असणार आंदोलन? 

आपण आपली गावे सांभाळायची आहे. कोणी तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. गावागावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. आता बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत. त्यांची काळजी घ्यायची आहे. आंदोलन २४ फेब्रवारीपासून रोज  सकाळी १०.३० वाजता सुरु करा. दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन सुरु ठेवा. ज्याला ही वेळ जमणार नाही, त्यांनी दुपारी ४ ते सात वाजता आंदोलन करायचे आहे. मराठ्यांचे हे आंदोलन शेवटचे असणार आहे. संपूर्ण देश हे आंदोलन बघणार आहे. आंदोलना दरम्यान शांतता ठेवायची आहे. कोणाची गाडी फोडायची नाही, काही जाळपोळ करायची नाही. आंदोलन संपल्यावर आपल्या शेतावर जाऊन काम सुरु करायचे आहे. रोज रास्ता रोको करुन सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, यासाठी निवेदन द्यायचे आहे. अधिकारी आल्याशिवाय निवेदन इतर कोणाला देऊ नका. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना निवेदन देतानाचे फोटो टाका, असे जरांगे पाटील म्हणाले.

(हेही वाचा Riot : छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक; पोलिसांनी केला लाठीमार)

३ मार्चला जिल्हास्तरावर रास्ता रोको 

२५ फेब्रुवारी रोजी सर्व वयस्क एकदिवसांचे उपोषण करणार आहेत. त्यानंतर ३ मार्चला प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको करायचा, असेही जरांगे पाटील म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.