Riot : छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक; पोलिसांनी केला लाठीमार

145

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपासून अवैध धंदे वाढल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या भागात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी पथकासह या परिसरात कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात आली. मात्र, यावेळी परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांवर अचानक दगडफेक (Riot) केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या. त्यामुळे येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या 

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात विश्रांती नगरमध्ये पोलिस अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाल्याचे दिसून आले. महानगरपालिकेचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक  (Riot) केली. अखेर पोलिसांना नागरिकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर लगेचच जेसीबीच्या माध्यमातून सदरील परिसरातील अतिक्रमण उदध्वस्त करण्यात आले. सदरील घटनेचे गांभीर्य पाहता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

(हेही वाचा Muslim : छत्रपती संभाजी नगरातून अटक केलेला महमंद झोएब खान करणार होता हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ले)

अतिक्रमण विरोधी पथक परिसरात पोहोचतात येथे मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. आंदोलन करत या ठिकाणी महिलांनी मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. याच दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी अचानक अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक  (Riot) सुरू केली. त्यामुळे पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचा बचाव करत येथून पळ काढला. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.