Land Records Department: भूमी अभिलेख विभागाची ‘ई-मोजणी -२’ नवीन प्रणाली पुणे जिल्ह्यातही लागू होणार

154
Land Records Department: भूमी अभिलेख विभागाची 'ई-मोजणी -२' नवीन प्रणाली पुणे जिल्ह्यातही लागू होणार
Land Records Department: भूमी अभिलेख विभागाची 'ई-मोजणी -२' नवीन प्रणाली पुणे जिल्ह्यातही लागू होणार

भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) ‘ई-मोजणी -२’ नवीन प्रणाली आता वेल्ह्यासह बारामती आणि पुरंदर तालुक्यांतही सुरू केली आहे. लवकरच पुणे जिल्ह्यातही ती लागू करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत करून ई-मोजणी २.0 ही नवीन प्रणाली आणली आहे. यामध्ये जमीनधारकाला स्वत:च मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज आणि मोजणी फी भरण्याची सुविधा आहे.

यासह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळणार आहे. जमीन मोजणीच्या नकाशाची प्रतसुद्धा ऑनलाइन मिळत आहे. या प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात करण्यात येत होता. आता पुरंदर आणि बारामती तालुक्यांत ई-मोजणी २.० चा वापर करून मोजणी होत आहे. (Land Records Department)

(हेही वाचा – Sakinaka Murder & Suicide Case : लुडो गेम खेळताना झालेल्या वादात सहकाऱ्याची हत्या करून एकाची आत्महत्या)

ई मोजणी २.० या संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे मोजणी करण्यात येत आहेत. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.