राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठाची ९ पैकी साथ सोडलेल्या ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांच्या भेटीनंतर आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. या खासदारांचा एक गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या ऑपरेशनसंदर्भात विचारले असता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी, थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. (Gulabrao Patil)
(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाची विजेतेपदाच्या बचावासाठी दमदार मोहीम)
संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस
ऑपरेशन टायगरसंदर्भात (Operation Tiger) बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, हे ऑपरेशन टायगर झाले, तर हे संजय राऊत यांच्यामुळेच होईल, असे एका पत्रकाराने विचारले, यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘मला यासंदर्भात काहीही माहीत नाही. पण संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. म्हणजे, आपण बघितले असेल की, यांनी ज्या दिवशीपासून सूत्र स्वीकारले, त्या दिवशीपासून अधोगतीच लागली आहे. यामुळे त्यांचा पाय पांढऱ्याच्या ऐवजी ‘काळा’ कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे.” (Gulabrao Patil)
(हेही वाचा – Mumbai : शुक्रवारपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, वीजपुरवठा, बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता)
खरे तर, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) चर्चा सुरु होती. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, आमदार अथवा खासदारांना त्यांच्या संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता असते. उबाठाचे एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. यामुळे त्यांच्या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
मंत्री उदय सामंत यांचा टोला
दिल्लीत झालेल्या शिवसेना उबाठाच्या खासदारांच्या बैठकीत, ३ खासदार उपस्थित होते. सहा कुठे गेले हे मलाही कळत नाही, असा मिश्किल टोला मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना उबाठाला लगावला. उबाठाचे खासदार शिवसेनेत येणार आहे. तर स्थानिक पदाधिकारी नाराज आहे यावर उदय सामंत यांनी निर्णय होऊ द्या, त्यानंतर बोल ना योग्य राहील असं सूचक व्यक्तव्य केले.
(हीही वाचा – NEET-UG 2026 फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द, रेल्वेसेवा अखंडित सुरू)
तसेच शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत अशी आमची इच्छा आहे. भाजपा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही त्यांचे नेते उच्च पदावर असवेत असं वाटत असते, मात्र अंबादास दानवे हे देखील एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर बसावं असं म्हणत असतील तर यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला कळत नाही असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

