-
प्रतिनिधी
BJP भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना “पळपुटे विरोधक” अशी उपमा दिली. परीक्षा विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी संसदेत उपस्थित न राहून विद्यार्थ्यांच्या हिताकडे पाठ फिरवल्याचा आरोप त्यांनी केला. (BJP)
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर तरतुदी असलेले ऐतिहासिक विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या कायद्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर शिक्षा आणि मोठा दंड होणार आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या विधेयकाच्या वेळी राहुल गांधी, काँग्रेस आणि विरोधकांनी संसदेतून पळ काढल्याचा आरोप त्यांनी केला. (BJP)
(हेही वाचा – करदात्यांसाठी आज ITR Deadline भरण्याची शेवटची तारीख, मुदतवाढ होणार का? जाणून घ्या…)
नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीत दिपके यांचा विष्णूचा अवतार म्हणून गौरव करत देव-देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी याबाबत संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. (BJP)
पुण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमावरूनही त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. अमित शाह यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (BJP)
(हेही वाचा – Missing Child Reunited : जोगेश्वरी पोलिसांची तत्परता; हरवलेल्या ८ वर्षीय विशेष मुलाला दीड तासात पालकांच्या केले स्वाधीन)
इंडि आघाडीवर टीका करताना नवनाथ बन यांनी “ईस्ट इंडिया कंपनी”ची तुलना करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. “इंडि आघाडी ही भ्रष्टाचारामुळे जनतेमध्ये ‘भ्रष्ट इंडिया कंपनी’ म्हणून ओळखली जाते,” असा आरोप त्यांनी केला. देशातील जनतेने ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच भ्रष्ट राजकारणालाही नाकारल्याचा दावाही त्यांनी केला. (BJP)
राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांवर उपरोधिक टीका करताना त्यांनी “अशा संशोधनासाठी त्यांना अंतराळातील पुरस्कार द्यावा,” अशी टिप्पणी केली. त्याचबरोबर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाहनांवरील हातांच्या ठशांच्या आधारे गुन्ह्यांचा तपास कसा होतो, या संदर्भातच पाटील यांनी विधान केले होते, असा खुलासा बन यांनी केला. (BJP)
(हेही वाचा – ‘तुकाराम मुंढे केवळ कायद्याचेच पालन करत आहेत!’ मंत्री Nitesh Rane यांच्याकडून कौतुक; विरोधकांवर जोरदार प्रहार)
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. तसेच पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

