Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ

शपथविधी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

124
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शनिवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. शपथबद्ध झाल्याने अशोक चव्हाण प्रथमच राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यानिमित्ताने चव्हाण यांचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद हे संसदीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. (Ashok Chavan)

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांचा शनिवारी शपथविधी पार पडला. पहिली शपथ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठीतून शपथ ग्रहण केली. यावेळी उपसभापती हरिवंश आणि राज्यसभा महासचिव पी. सी. मोदी, चव्हाण यांच्या पत्नी, माजी आमदार अमिता चव्हाण, दोन्ही कन्या सुजया चव्हाण आणि श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. (Ashok Chavan)

(हेही वाचा – North Mumbai Lok Sabha Constituency : मालाडमध्ये मतदारांची संख्या सर्वांधिक)

शपथविधी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उभारणीसाठी मी सर्वोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. राज्यसभेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. (Ashok Chavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.