ड्रग माफिया फारुखचा मुलगा शादाब बटाटा गजाआड!

96

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागा(एनसीबी)ची कारवाई जोरात सुरू आहे. पानवाल्यांपासून ते अंडरवर्ल्डशी संपर्क असलेल्या सर्वांवर एनसीबीने कारवाई करत गजाआड केले आहे. त्यातच एनसीबीने गुरुवारी सर्वात मोठा ड्रग पुरवठादार फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली आहे.

तीन ठिकाणी छापेमारी

एनसीबीने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करत शादाबला बेड्या ठोकल्या. गुरुवारी रात्री एनसीबीने लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड येथे छापेमारी करत तब्बल दोन कोटी रुपयांचा एमडी ड्रगचा साठा ताब्यात घेतला आहे. यासोबतच एनसीबीने महागड्या गाड्याही जप्त केल्या आहेत.

WhatsApp Image 2021 03 26 at 10.52.35 AM

वॉलिवूडमधला मोठा ड्रग पुरवठादार

ड्रग माफिया फारुख बटाटाचा मुलगा शादाब हा भारतातील मोठा ड्रग पुरवठादार आहे. बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनाही तो ड्रग पुरवत असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी त्याच्या मागावर होती. अखेर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी होणार असून, चौकशीत अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे.

कोण आहे फारुख बटाटा

फारुख बटाटा हा विदेशातून येणा-या एमडी, एलएसजी, गांजा, कोकीन यांसारख्या ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा फारुख बटाटाद्वारे केला जातो. हाय प्रोफाइल लोकांसोबतच मुंबईतील मोठे बार आणि पार्ट्यांमध्ये फारुख ड्रगचा पुरवठा करत असतो. पूर्वी बटाट्याची विक्री करणारा फारुख शेख हा अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला आणि फारुख बटाटा या नावाने ड्रगचा व्यापार करायला त्याने सुरुवात केली. त्याचा ड्रगचा संपूर्ण व्यवसाय आता त्याची दोन्ही मुलं सांभाळत आहेत. त्यापैकीच शादाब बटाटाला अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.