Kharghar Accident : खारघर दुर्घटनेचा अभ्यास करणाऱ्या समितीला मुदतवाढ

117
Kharghar Accident : खारघर दुर्घटनेचा अभ्यास करणाऱ्या समितीला मुदतवाढ
Kharghar Accident : खारघर दुर्घटनेचा अभ्यास करणाऱ्या समितीला मुदतवाढ

नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताने नागरिकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी विधानसभा आमदार सुनिल प्रभू आणि जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान १४ श्री अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीच्या विनंती वरून समितीला १३ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

(हेही वाचा – “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे ‘या’ दिवशी होणार आयोजन; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते होणार उद्घाटन)

या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याची कार्यवाही एक सदस्य समितीमार्फत सुरू आहे. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ७० लाख रूपये इतके अर्थसाह्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आले आहे, अशीही माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.