जानेवारीपासून बोंबलायचंय म्हणून सध्या घशाला आराम देतोय, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

102

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे सज्ज राहा, असे आदेश शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आता उद्धव ठाकरेंनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा निवडणुकीचे संकेत दिल्याचे समोर आले आहे. राज्यात लवकरच निवडणुका लागतील, असे भाकित राज ठाकरेंनी केले आहे. राज यांच्या या वक्तव्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

(हेही वाचा – मनोरा’ कागदावरच! चार वर्षांपूर्वी जमीनदोस्त; मूळ खर्चात ४०० कोटींची वाढ)

मुंबईतील परळ येथील कामगार मैदानात मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची सांगता रविवारी झाली. यावेळी राज ठाकरे देखील उपस्थित होते त्यांनी मध्यवधी निवडणुकांवर भाष्य करताना जानेवारीपासून बोंबलायचे आहे, असे खोचकपणे विधान केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

दरम्यान, राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांना हजर राहत आहेत. राज ठाकरेंच्या हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर नाहीत ना.. अशी चर्चा देखील सर्वत्र सुरू आहे. राज ठाकरे यांनी आता येत्या जानेवारीत निवडणुकांचे संकेत दिले आहेत. तर राज ठाकरे म्हणाले की, मी आता भाषणाला उभा नाही. त्यामुळे घशाला सध्या आराम देतो आहे. निवडणुका लागतील, त्यामुळे जानेवारीमध्ये बोंबलायचंच आहे. घसा आपला असतो तर गळा लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या लोकांचा असतो.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून राज्यात जानेवारीमध्ये निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र या निवडणुका मुंबई महापालिकेच्या असतील की विधानसभेच्या हे अद्याप राज ठाकरेंनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जानेवारीत नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार याची चर्चा होऊ लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.