Devendra Fadnavis : नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने केलेले कार्य हा एक ट्रेलर आहे. देशाला विकसित, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरेच काही घडायचे आहे. मोदींजींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षांत गरीबीमुक्त, बेरोजगारी मुक्त व समता युक्त भारत घडवायचा आहे.

93
Devendra Fadnavis : राहुल गांधी, ठाकरेंकडून महिला शक्तीचा वारंवार अवमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (२७ मार्च) नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis)

या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेनंतर महायुतीने विधान भवन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या भव्य मिरवणुकीने गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत)

जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी “नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती आहेत” अशा शब्दांत गडकरी यांचा गौरव केला. ते म्हणाले की, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने केलेले कार्य हा एक ट्रेलर आहे. देशाला विकसित, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरेच काही घडायचे आहे. मोदींजींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षांत गरीबीमुक्त, बेरोजगारी मुक्त व समता युक्त भारत घडवायचा आहे. पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केला आहे त्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षांत रोवली जाणार असून त्यासाठी मोदीजींना सलग तिस-यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)

भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होती. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.