‘काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी आज सोडवला’; एकनाथ शिंदेंनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

83

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी आज सोडवला अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा वारसा आहे. जे कोण आज बोलत आहेत त्यांनी २०१९ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. बाळासाहेबांचे विचार विकण्याचे मोठे पाप केले. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असे म्हटले जाते. ही दुटप्पी भूमिका ते घेत आहेत, त्यांना त्यांची जागा निकालाने दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी यापूर्वीच धनुष्यबाण गोठवले जाईल असे म्हटले होते. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन येथील सुरक्षेत वाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.