घाटकोपर आणि विक्रोळीतील डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण

186

असल्फा गाव व विक्रोळी पार्क साईट आदी डोंगरावरील भागांमधील पाणीपुरवठ्यात सुधारणा करून टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार तांत्रिक बाबीची माहिती घेण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण केले जात असून या सर्वेक्षणानंतर डोंगरावरील भागांमध्ये राहणाऱ्या अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यात यश मिळेल, असा विश्वास जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. यासाठी संस्थेची नेमणूक केली असून या प्रस्तावाला प्रशासकांनी मंजुरी दिली आहे.

पूर्व उपनगरातील महापालिकेच्या एल भागातील घाटकोपर पश्चिम असल्फा गाव येथील उंचावर वसलेल्या साने गुरुजी नगर येथील ठिकाणी म्हणजेच हनुमान टेकडी, खांडेकर मैदान, मुकुंदराव आंबेडकर नगर (अजिक्य तारा) तसेच तर महापालिकेच्या एन विभागातील विक्रोळी पार्क साईट डेपो पाडा येथील लोवर डेपो पाडा, अपर डेपो पाडा, महापालिका इमारती, महापालिका वसाहती,यशवंत नगर, अंबिका नगर पार्क साईट इत्यादी ठिकाणे उंचावर वसलेल्या असल्याने तेथील जनतेला अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.

टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला

तेथील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याकरता नवीन पाणी पुरवठा योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे डोंगराळ भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामांची योजना आणि आराखड्याची सर्वसाधारण रचना करताना त्याठिकाणी जलवाहिन्यांचे जाळे आणि इतर कामे करण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून या कामांची निविदा काढून टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या डोंगराळ भागातील तब्बल ४ लाख ४६ हजार २०० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळाच्या जागेचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये जे ओबी इन्फ्रा या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी १ कोटी ०२ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

(हेही वाचा शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.