MNS : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना शिंदे गटाची ऑफर

284
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यानुसार राजकीय पक्ष एकमेकांशी युती-आघाडी बनवण्याच्या मागे लागले आहेत. त्यातच शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी थेट मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना शिंदे गटासोबत येण्याची ऑफर दिली.
जर लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ पेक्षा अधिक संख्येने जागा जिंकायच्या असतील तर राज ठाकरे महायुतीत आलेच पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत ४५ हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.

अपात्र आमदार प्रकरणी निर्णयाची चिंता नाही

१० जानेवारी रोजी शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी जो निकाल लागणार आहे, त्याची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. एकनाथ शिंदेंचा दौरा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. ११ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार, असेही संजय शिरसाट म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.