Maharashtra Day 2024 : हिंदुत्वाचा बालेकिल्ला – जय जय महाराष्ट्र माझा

१ मे रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ६४ वर्षांत आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार आपण गांभिर्याने करायला हवा.

106
Maharashtra Day 2024 : हिंदुत्वाचा बालेकिल्ला - जय जय महाराष्ट्र माझा
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

१ मे रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ६४ वर्षांत आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार आपण गांभिर्याने करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा (Chhatrapati Shivaji Maharaj) जगाने वंदन करावा असा महापुरुष जन्माला येऊनही महाराष्ट्र मुघलवृत्तीच्या कॉंग्रेसच्या आहारी गेला हे दुर्दैव आहे. १९२० नंतर छत्रपतींच्या मार्गाने चालणा-या क्रांतिकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी कॉंग्रेसचे वर्चस्व वाढू दिले. दरम्यान महाराष्ट्राला सावरकर, आंबेडकर यांसारखे महान नेते लाभले नसते तर आपले राज्य पूर्णपणे होरपळून निघाले असते. (Maharashtra Day 2024)

कॉंग्रेस संस्कृतीच्या प्रभावाचा आपल्याला खूप मोठा फटका बसला आहे. दक्षिण भारताप्रमाणे खोटी भाषिक अस्मिता आपल्यावर लादण्याचा प्रयत्न झाला. आपण बिहार आणि उत्तर प्रदेशकडे बोट दाखवत असताना जातीवादाने आपल्याकडेही डोके वर काढले. जातीअंताची लढाई लढणारेच जातीयवादी निघाले. ’पुरोगामी महाराष्ट्र’ म्हणत स्वयंघोषित लबाड पुरोगाम्यांनी ब्राह्मण आणि हिंदुंविरोधी मोहिम राबवली. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले. मात्र आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) संस्कार झाले आहेत आणि त्या संस्कारांची जाण सावरकरांनी आपल्याला करुन दिली. त्यामुळे एकीकडे पुरोगाम्यांचा अतिरेकपणा सुरु असताना दुसरीकडे अतिशय संयमाने हिंदुत्वाचा झेंडा घेऊन काही लोक पुढे जात होते. (Maharashtra Day 2024)

(हेही वाचा – Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका)

महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाबद्दल बोललं जात आहे. पण आपण हे विसरलो की हिंदू म्हणून जगण्याचं आरक्षण आपणच हिंदुस्थानाला दिलेलं आहे. अतिरेकी जिहादी वाळवंटी संस्कृतीसमोर अनेकांनी गुडघे टेकले तेव्हा महाराष्ट्रातला १६ वर्षांचा मुलगा पुढे आला आणि तोरणा किल्ला जिंकून या मुलाने स्वराज्याचे तोरण बांधले. कवी भुषण छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करताना म्हणतात,
‘काशी की कला जाती
मथुरा की मस्जिद होती
अगर शिवाजी न होते
तो सुन्नत होती सबकी’
या ओळींचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कुणीही हिंदू राहिलं नसतं. हे जिहादी राष्ट्र झालं असतं. म्हणजे मराठी माणूस नसता तर सबंध हिंदुस्थान हा पाकिस्तान झाला असता. इतकी क्षमता या मराठी मातीत आहे. असं असताना आज आपण आरक्षण, जातीयवाद यामध्ये अडकून गेलो आहोत. हनुमंताला ज्याप्रमाणे शाप होता की ऐनवेळी त्याला त्याच्या शक्तीचा विसर पडेल. आपलीही तीच गत झाली आहे. आपल्याला आपल्या शक्तीचा विसर पडला आहे. आपली क्षमता, आपली पात्रता आपल्यालाच माहित नाही. मात्र २०१४ नंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. आपण मागणारे नाही तर आपण देणारे आहोत, ही जाणीव आपल्याला होऊ लागली आहे. अदानी-अंबानी यांना शिव्या घालून मराठीपण जपता येत नाही. (Maharashtra Day 2024)

मुळात मराठीपण आणि हिंदूपण या दोन वेगळ्या गोष्टी नसून या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्र हा नेहमी भारताच्या रक्षणासाठी धावून गेलेला आहे. हिंदुस्थान जर ’शक्तिपीठ’ असेल, तर या पवित्र शक्तिपीठाचं रक्षण करणारा महाराष्ट्र हा ’भैरव’ आहे. महाराष्ट्र हा नेहमीच हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कॉंग्रेस संस्कृतीने नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष केला. त्यांनी सावरकरांचा द्वेष केला. कारण त्यांना माहिती आहे की मराठी माणसाला जर त्याच्या क्षमतेची जाणीव झाली, तर भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही छाती होणार नाही आणि हेच या सेक्युलर संस्कृतीला नकोय. हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करुन दिली तर तो रुद्र अवतार लंका जाळून येतो. आपण सतत मराठी माणसाला त्याच्या क्षमतेची जाणीव करुन देत राहिली पाहिजे. मराठी माणसाला त्याची हिंदुत्वाची खरी ओळख सतत करुन देत राहिली पाहिजे. हे काम साहित्यिकांचं आहे, विचारवंतांचं आहे. मराठी माणूस हिंदुत्वापासून कधीही दूर जाता कामा नये. कारण छत्रपतींनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकलेली आहे, ती जबाबदारी आपण निभावली पाहिजे. महाराष्ट्र हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे आणि तो सदैव बालेकिल्ला राहिला पाहिजे. (Maharashtra Day 2024)
जय महाराष्ट्र!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.