Dheeraj Sahu : ‘तो मी नव्हेच…’; आयकर विभागाच्या छापेमारीनंतर धीरज साहू यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

आयकर विभागाने ६ डिसेंबरपासून धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थाविरुद्ध सुरू केलेली कारवाई अखेर शुक्रवार १५ डिसेंबर रोजी संपली. यादरम्यान ३५३.५ कोटींची रोख रक्कम सापडली. भारतातील कोणत्याही तपास संस्थेने केलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आसल्याचे म्हटले जात आहे.

197
Dheeraj Sahu : 'तो मी नव्हेच...'; आयकर विभागाच्या छापेमारीनंतर धीरज साहू यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू (Dheeraj Sahu) सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यांच्या घरातून इतक्या नोटा सापडल्या की त्या मोजता मोजता तिथली मशीन्सही बिघडली. टॅक्स चोरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते शिवाय कॉंग्रसकडूनच आपल्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर धीरज साहू (Dheeraj Sahu) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा सगळा पैसा स्वःताचा नसल्याचा दावा केला आहे. तसेच या सगळ्याचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा – Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर)

नेमकं काय म्हणाले धीरज साहू ?

कॉँग्रेस खासदार धीराज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरातून ३५० कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर त्यांनी, आपलं कुटुंब सगळं व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर धाड टाकण्यात आली त्यांचा आहे. तसेच या पैशाचा आणि कॉँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नसल्याचं साहू यांनी सांगितलं.

(हेही वाचा – RatanTata : सुरक्षा वाढवा नाहीतर… रतन टाटांना धमकीचा कॉल, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर)

आयकर विभागाने ६ डिसेंबरपासून धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थाविरुद्ध सुरू केलेली कारवाई अखेर शुक्रवार १५ डिसेंबर रोजी संपली. यादरम्यान ३५३.५ कोटींची रोख रक्कम सापडली.

भारतातील कोणत्याही तपास संस्थेने केलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आसल्याचे म्हटले जात आहे. (Dheeraj Sahu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.