Sugar cane Juice : ‘इतक्या टनापर्यंत ‘ इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; शेतकऱ्यांना दिलासा

या निर्णयामुळे १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे.

152
Sugar cane Juice : 'इतक्या टनापर्यंत ' इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; शेतकऱ्यांना दिलासा
Sugar cane Juice : 'इतक्या टनापर्यंत ' इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; शेतकऱ्यांना दिलासा

ऊसाच्या रसापासून (Sugar cane Juice) आणि बी श्रेणीतील मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी (१५ डिसेंबर)  घेतला. या निर्णयामुळे १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तसेच कारखानदारांना दिलासा. (Sugar cane Juice)

मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय अन्न मंत्रालायचे सचिव संजीव चोपडा यांनी दिली. ७ डिसेंबरला ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी ६ लाख टन इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले होते. चालू वर्षात उसाचे उत्पादन ३७ दशलक्ष मेट्रिक टना वरुन ३२ दशलक्ष मेट्रिक टना पर्यंत घटण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. (Sugar cane Juice)

(हेही वाचा : RatanTata : सुरक्षा वाढवा नाहीतर… रतन टाटांना धमकीचा कॉल, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर)

याच पार्श्वभूमीवर केंद्राने काही दिवसांपूर्वीच ऊयासच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. या निर्णयचे पडसाद देशभरातील साखर उद्योगांवर पडले होते. साखर कारखानदाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बी आणि सी श्रेणीतील मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचा सूरही या बैठकीत व्यक्त केला होता. नकारात्मक परिणामाची भीती असल्यामुळे बंदीचा निर्णय थांबविण्याचे स्पष्ट संकेत चार दिवसांपूर्वीच देण्यात आले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.