RatanTata : सुरक्षा वाढवा नाहीतर… रतन टाटांना धमकीचा कॉल, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. 

189
RatanTata : सुरक्षा वाढवा नाहीतर... रतन टाटांना धमकीचा कॉल, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
RatanTata : सुरक्षा वाढवा नाहीतर... रतन टाटांना धमकीचा कॉल, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

मुंबई कंट्रोल रूमला (Mumbai Control Room) धमक्यांचे फोन येणे काही थांबेनात मात्र यावेळी फोन करणाऱ्याने सांगितले की टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटांची (Ratan Tata) सुरक्षा वाढवा अन्यथा त्यांची अवस्था सायरस मिस्त्रींसारखी होईल. मुंबई पोलिसांना असा कॉल आल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पोलिसांनी एका टीमला त्यांच्या सुरक्षेची पाहणी करण्याचे निर्देश दिलेत. तर दुसऱ्या टीमला फोन कॉल करणाऱ्याचा तपास करणाऱ्यास तपास करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.  (RatanTata)

फोन करणाऱ्याला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असतं त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदत घेत टेलिकॉम कंपनीच्या सहाय्याने कॉल करणाऱ्याचा शोध घेतला. त्याचे लोकेशन कर्नाटकात असल्याचं आढळलं. तर त्याचा पत्ता पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. RatanTata

(हेही वाचा : Bangladesh Mukti Sangram : भारतीय जवानांमुळे बांगलादेशला स्वातंत्र्य; जाणून घेऊया काय आहे ’मुक्ती संग्राम’?)

पुण्यात पोलिसांनी त्याच्या घराचा शोध घेतला. तिथे माहिती घेतली असता गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता आहे. तर त्याच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात केली होती अशी माहिती मिळाली आहे.पोलीसांनी घरच्यांची चौकशी केली तेव्हा सदर व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली गेली नसल्याचे एका आधिकऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.