Dhairyasheel Mane : … तोपर्यंत प्रचार करणार नाही; संजय पाटील धैर्यशील मानेंचा प्रचार केव्हा करणार ?

Dhairyasheel Mane : संजय पाटील (Sanjay Patil) यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत सन्मान मिळत नाही, तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे.

148
Dhairyasheel Mane : ... तोपर्यंत प्रचार करणार नाही; संजय पाटील धैर्यशील मानेंचा प्रचार केव्हा करणार ?
Dhairyasheel Mane : ... तोपर्यंत प्रचार करणार नाही; संजय पाटील धैर्यशील मानेंचा प्रचार केव्हा करणार ?

हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha) लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची उमेदवारी पक्की करण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्यावर मधल्या काळात बरेच आरोप करण्यात येत होते. आता भाजप नेत्यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे.

(हेही वाचा – Gyanvapi Case : पूजा सुरुच रहाणार; सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला पुन्हा एकदा फटकारले)

कार्यकर्त्यांनी वाढवला दबाव 

संजय पाटील (Sanjay Patil) यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत सन्मान मिळत नाही, तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. धैर्यशील माने यांना इचलकरंजी (Ichalkaranji) भाजप कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा रोषाचा सामना करावा लागला होता. ‘माझे सर्व पक्षातील नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये’, असा कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

१ एप्रिलच्या रात्री उमेदवारीचा निर्णय 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ६ विधानसभा एकत्र करून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. तथापि महायुतीची उमेदवारी निश्चित करण्याबाबत १ एप्रिलच्या रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्याला शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Dhairyasheel Mane)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.