Arvind Kejriwal : आतिशी आणि सौरभ भारद्वाज EDच्या रडारवर, केजरीवालांमुळे अडचणीत वाढ

केजरीवालांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ईडीने केला. तसेच चौकशीदरम्यान त्यांनी सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचे नाव घेतल्याचेही सांगितले.

132
Arvind Kejriwal : आतिशी आणि सौरभ भारद्वाज EDच्या रडारवर, केजरीवालांमुळे अडचणीत वाढ

दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेविरोधात इंडी आघाडीची महारॅली पार पडली. विरोधकांनी तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर या वेळी सडकून टीका केली. या रॅलीसाठी आपकडून प्रचंड मेहनत घेण्यात आली. त्यामुळे प्रामुख्याने केजरीवाल सरकारमधील मंत्री आणि त्यांचे विश्वासू नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज आघाडीवर होते. आज हेच दोघे ईडीच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. (Arvind Kejriwal)

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने नुकतीच केजरीवालांना (Arvind Kejriwal) अटक केली आहे. आज त्यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने कोर्टात मोठा दावा केला आहे. केजरीवालांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ईडीने केला. तसेच चौकशीदरम्यान त्यांनी सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचे नाव घेतल्याचेही सांगितले. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – Gyanvapi Case : पूजा सुरुच रहाणार; सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला पुन्हा एकदा फटकारले)

ईडीने म्हटले आहे की, ‘विजय नायर हा आपल्याला नव्हे तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होता, असे केजरीवालांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.‘ ईडीच्या वकिलांकडून कोर्टाला हे सांगितले जात असताना केजरीवालांनी त्याचे खंडन केले आहे. ते गप्प बसून राहिले होते. घोटाळ्यातील पैशांचा वापर गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. आतिशी या त्यावेळी गोवा आपच्या प्रभारी होती. त्यामुळे आता संशयाची सुई आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्याकडे वळल्याची चर्चा आहे. ईडीकडून या दोघांची चौकशी होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.