Bank FD Rate : आघाडीच्या बँकांमध्ये सध्या काय आहे मुदतठेवींवरील व्याज?

Bank FD Rate : बँकेच्या मुदतठेवींवर तुम्हाला किती परतावा मिळू शकेल याचा घेतलेला हा आढावा. 

187
Bank FD Rate : आघाडीच्या बँकांमध्ये सध्या काय आहे मुदतठेवींवरील व्याज?
  • ऋजुता लुकतुके

भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. आत्तापासून गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात मोठा परतावा मिळू शकतो. मात्र, गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमची ठेव सुरक्षित आहे का? आणि दुसरं म्हणजे तुमच्या ठेवीवर परतावा किती मिळतोय? या दोन गोष्टींची खबदारी घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर बँकेत मुदत ठेव (FD) करायची असेल तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेत एफडीवर किती व्याजदर आहेत. (Bank FD Rate)

ग्राहकांनी बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या बँकेत किती व्याजदर मिळतो याची माहिती घेणं गरजेचं आहे. इतर बँकांची तुलना करता कोणत्या बँकेत जास्त व्याजदर मिळतो, हे पाहणं महत्वाचं आहे. देशातील प्रमुख असणाऱ्या एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफशी बँकामध्ये एफडी वर किती व्याज मिळते, त्याबाबतची माहिती पाहुयात. बँक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकेमध्ये एफडीवर चांगला परतावा मिळतो. २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवर या बँकांमध्ये ७.७५ टक्के व्याज मिळत आहे. तर एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीसी या दोन बँक वार्षिक एफडीवर ७.७५ टक्के व्याज देतात. (Bank FD Rate)

(हेही वाचा – Shiv Sena शिंदे दक्षिण मुंबईसाठी का आग्रही?)

कोणत्या बँकेत किती दिवसासाठी किती दर

एचडीएफसी बँक

१५ ते २९ दिवसांसाठी – ३ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के
९० ते ६ महिने – ४.५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५ टक्के
१ वर्ष ते १५ महिने – ६.६०, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.१० टक्के
३ वर्षं ते ५ वर्षे – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५ टक्के
५ वर्षे ते १० वर्षे – ७ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५ टक्के (Bank FD Rate)

आयसीआयसीआय बँक

१५ ते २९ दिवसांसाठी – ३ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के
९० ते १२० दिवस – ४.७५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के
१ वर्ष – ६.७०, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२० टक्के
२१ महिने ते २ वर्षे – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५ टक्के
५ वर्षे ते १० वर्षे – ७ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.७५ टक्के (Bank FD Rate)

एसबीआय बँक

७ ते ४५ दिवसांसाठी – ३ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के
१८० ते २१० दिवस – ५.२५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.७५ टक्के
१ वर्ष ते २ वर्षं – ६.८०, ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.३० टक्के
३ ते ५ वर्षे – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७ टक्के
५ वर्षे ते १० वर्षे – ६.५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के (Bank FD Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.