Lok Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीमध्ये भाजपा उमेदवारांसाठी रोड शो

मनोज तिवारी आणि प्रवीण खंडेलवाल यांना विजयी करण्याचे आवाहन

136
Lok Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीमध्ये भाजपा उमेदवारांसाठी रोड शो

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आटोपताच दिल्लीकडे कूच करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपा उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. दिल्लीतील चांदणी चौक आणि उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी रोड शो सुध्दा केला. लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. शेवटच्या दिवशी भाजपाने आपली पूर्ण ताकद प्रचारात झोकून दिली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल, बुधवारपासून दिल्लीत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक संपल्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीकडे कूच केली. चांदणी चौकातील भाजपाचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी त्यांनी बुधवारी रोड शो केला होता. तर उत्तर पूर्व दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांच्यासाठी गुरुवारी रोड शो केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रोड शोमध्ये स्थानिक लोकांची गर्दी उसळली होती. रोड शोमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी जमली होती. फडणवीस आणि तिवारी यांना पाहण्यासाठी स्थानिक जनता आपआपल्या घराच्या गच्चीवर एकत्र जमल्याचे दिसून आले. (Lok Sabha Election 2024)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. येथे काँग्रेसने जेपी अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांनी रोड शो केला. या जागेवरून काँग्रेसने कन्हैया कुमारला उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी दिल्लीतील सातही जागांवर मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा अर्जेंटिनाकडून लाजिरवाणा पराभव, पुरुषांचा मात्र पेनल्टी-शूटआऊटवर विजय)

दिल्लीतील सातही जागांसाठी १६२ उमेदवार मैदानात

भारतीय जनता पक्ष दिल्लीतील सर्व सातही जागांवर विजय मिळविल्याशिवाय राहणार नाही, असा दावा स्थानिक लोकांकडून केला जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. ते थोड्या दिवसांसाठीच बाहेर आले आहेत. २ जून रोजी त्यांना पुन्हा तुरुंगात परत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काश्मीरातून कलम ३७० हटविले आणि प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर बांधले. दहा वर्षात किती कामे केली हे जनतेला दिसत आहे. यामुळे भाजपा दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकेल असा विश्वास लोकांकडून व्यक्त केला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २५ वर्षांचा विकासाचा रोडमॅप तयार केला असून भारताला विकसित देश बनविण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. ही मोदींची गॅरंटी आहे, असे गीत वाजविले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला. दिल्लीतील सात जागांसाठी १६२ उमेदवार मैदानात आहेत. अशा स्थितीत गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचारासाठी पूर्ण जोर लावला आहे. मतदानाच्या ३६ तास आधी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता लोकसभा निवडणुकीचा दणदणाट थांबणार आहे. यानंतर उमेदवारांना मिरवणूक आणि जाहीर सभा घेता येणार नाहीत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.