‘काँग्रेसचं सरकार ७ जन्मात येणार नाही’; हरयाणामधून PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील महेंद्रगड येथे पोहोचले. याच दरम्यान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

101
‘काँग्रेसचं सरकार ७ जन्मात येणार नाही’; हरयाणामधून PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

राज्यात लोकसभा २०२४ (Lok sabha Election 2024) च्या पाचव्या टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून, सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचारसभा शिगेला पोहोचल्या आहेत. याच दरम्यान सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हरियाणामध्ये गेले होते. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसचे सरकार ७ जन्मातही येणार नाही, काँग्रेसला दिलेलं प्रत्येक मत वाया जाईल” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

पंतप्रधान मोदी हरियाणामधील महेंद्रगड (Haryana Mahendragarh) येथील जनतेला संबोधित करत होते. यावेळी मोदींनी इंडि आघाडीवर (Indi Alliance) जोरदार निशाणा साधला. “गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी इंडि आघाडीतील लोकांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. पाच वर्षांत पाच पंतप्रधान होतील, असं सांगितलं जात आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान, यावर हरियाणाचे लोक पाच हजार विनोद बनवतील. असे सूचक विधान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच इंडि आघाडीचे लोक अत्यंत जातीयवादी, घराणेशाहीवाले आहेत.” असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा – FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा अर्जेंटिनाकडून लाजिरवाणा पराभव, पुरुषांचा मात्र पेनल्टी-शूटआऊटवर विजय )

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मला राजकारणाची समज हरियाणा आणि पंजाबमधूनही मिळाली. मी हरियाणामध्ये १९९५ मध्ये आलो. मी येथील माता-भगिनींच्या हातचे अन्न खाल्लं आहे. आता मोदींना तुमचं हे कर्ज फेडण्यासाठी खूप काम करायचं आहे. आपल्या हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठीच पुन्हा एकदा मोदी सरकार गरजेचं आहे.” तसेच काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसने देशाची फाळणी केली. त्यांनी एक भारत, दोन मुस्लिम राष्ट्रे निर्माण केली आणि आता उरलेल्या भारतावरही मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे इंडि आघाडीतील लोक म्हणत आहेत. ते आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.