Swati Maliwal Attack Case : मारहाणीनंतर स्वाती मालीवाल यांची पहिली मुलाखत, म्हणाल्या…

163
Swati Maliwal Attack Case : मारहाणीनंतर स्वाती मालीवाल यांची पहिली मुलाखत, म्हणाल्या...

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीत केजरीवाल तुमच्याकडे राज्यसभेची जागा परत मागत होते, असे बोलले जात आहे, हेच संपूर्ण प्रकरण आहे का? यावर स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, त्यांना माझी राज्यसभेची जागा हवी होती, त्यांनी प्रेमाने मागितली असती, तर मी माझा जीव दिला असता. खासदारपद देणे ही फार छोटी गोष्ट आहे. आता जगातील कोणतीही सत्ता माझ्या वाटेवर आली, तरी मी राजीनामा देणार नाही. (Swati Maliwal Attack Case)

गुरुवारी, एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की, १३ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे कर्मचाऱ्यांनी आम्हाला ड्रॉईंग रूममध्ये बसवले आणि सांगितले की, केजरीवाल घरी आहेत आणि भेटायला येत आहेत. (Swati Maliwal Attack Case)

त्याचवेळी बिभव कुमार तिथे आला आणि मला मारहाण करू लागला. बिभवने माझ्यावर सात-आठ वार केले. मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझा पाय धरला. मला खाली ओढले. मालीवाल पुढे म्हणाल्या की, माझे डोके टेबलावर आपटले. मी खाली पडले. मग त्यांनी मला लाथा मारायला सुरुवात केली. मी खूप जोरात ओरडले, पण कोणीही मदतीला आले नाही.

(हेही वाचा – Water Cut : वरळी, लोअर परळ, करी रोडमध्ये बिनधास्त पाणी वापराला ब्रेक; आत्तापासूनच पाणी सांभाळून वापरा )

१३ मे रोजी केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पोलिसांनी १६ मे रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवून बिभव कुमारला अटक केली आहे. सध्या तो ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

मी स्वतःसाठी का लढू नको ?
बिभवने तुम्हाला कोणाच्या सांगण्यावरून मारले का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या घरात कोणाला मारहाण होत असेल आणि कोणी घराबाहेर पडत नाही, असे घडत नाही. ही खूप विचित्र गोष्ट आहे. मी जोरात ओरडत होते. कोणीही मदतीला आले नाही हे सत्य आहे. बिभवने कोणाच्या सांगण्यावरून मारहाण केली हा आता तपासाचा भाग आहे. मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. मी कोणालाही क्लीन चिट देत नाही; कारण वस्तुस्थिती अशी आहे की, मी ड्रॉईंग रूममध्ये होते. मी किंचाळत होती. केजरीवालजी घरी होते, पण तरीही कोणी मदतीला आले नाही. मी विचार केला नाही की माझे काय होईल? माझ्या करिअरचे काय होणार? हे लोक माझे काय करतील? मला फक्त असे वाटले की, सर्व स्त्रियांना सांगितलेली गोष्ट म्हणजे सत्याच्या पाठीशी उभे राहणे. तुमची चूक झाली नसेल, तर जरूर लढा. मग मी स्वतःसाठी का लढू नको ?

तुमचे दोन व्हिडिओ आले, मारहाण झाली तर तुम्ही एवढ्या आरामात कसे चालत होता? तसेच पॉलिग्राफ चाचणीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, मी शिवीगाळ करत असताना बिभवने व्हिडिओ बनवला होता. तो संपूर्ण व्हिडिओ त्याने मीडियाला का दिला नाही? माझ्या सहज जाण्याचा प्रश्न आहे, माझ्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत मी किती मुलींना मदत केली आहे. जेव्हा मी निर्भयाच्या आईला भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की, माझी मुलगी आता या जगात नाही हे चांगले आहे. त्यांना या देशात न्याय मिळताना अपमान सहन करावा लागला नाही. लोक निर्भयावरच प्रश्न उपस्थित करत होते. दिल्लीच्या महिला मंत्री म्हणतात की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना माझे कपडे फाटलेले दिसले ना माझे डोके फुटलेले दिसले, त्यामुळे आता एवढेच राहिले आहे. मी पॉलीग्राफ चाचणीसाठीही तयार आहे.

बिभव कुमारवर मारहाणीचे गुन्हे दाखल
बिभव कुमारच्या पक्षातील भूमिकेविषयी त्यांनी सांगितले की, बिभवकुमारला पक्षातील प्रत्येकजण घाबरतो. तो खूप प्रभावशाली व्यक्ती आहे. बिभवला राग आला, तर तुमचं काम संपलं, असा समज पक्षात आहे. त्याच्यावर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

नि:पक्षपातीपणे तपास करावा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी प्रथमच हल्ल्याच्या घटनेवर विधान केले. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही घटना माझ्यासमोर घडली नाही. या प्रकरणाला दोन बाजू आहेत. पोलिसांनी याचा नि:पक्षपातीपणे तपास करून न्याय मिळावा. केजरीवाल पुढे म्हणाले की, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे ते यावर जास्त बोलू इच्छित नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.