Birthday Wishes in Marathi : आता आपल्या प्रियजनांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अगदी सर्जनशील मार्गाने!

  112
  Birthday Wishes in Marathi : आता आपल्या प्रियजनांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अगदी सर्जनशील मार्गाने!
  Birthday Wishes in Marathi : आता आपल्या प्रियजनांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अगदी सर्जनशील मार्गाने!

  वाढदिवस हा आयुष्यातील एक अनमोल क्षण असतो. हा आनंद अद्भुत असतो. आपण ज्या दिवशी जन्माला आलो, तो दिवस साजरा करण्यात वेगळीच मजा असते. आणि अशा दिवशी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन आपण त्यांचा आनंद द्विगुणित करत असतो. (Birthday Wishes in Marathi)

  मात्र त्याच त्याच शुभेच्छा देऊनही कंटाळा येतो. काहीतरी हटके किंवा काव्यात्मक शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या चेहर्‍यावरही स्मितहास्य फुलतं. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजाना… (Birthday Wishes in Marathi)

  (हेही वाचा – Crime News: ग्राहकाने मागितला गरम समोसा, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके)

  1. येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
   जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा
   मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
   प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
   आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
   जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
  2. शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो
   कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
   विजयाची ललकारी तुमची दाही दिशांना गुंजत राहो
   वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  3. झेप घ्यावी तुम्ही आकाशी
   स्पर्धा फक्त असावी स्वतःची स्वतःशी
   तुमची आणि माझी बांधिलकी मनाची मनाशी
   एवढेच मागणे ईश्वराकडे की व्हावे तुम्ही शतायुषी
   वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
  4. नवा दिवस नवी पहाट
   आयुष्यात भेटो हवी तशी वाट
   वाढदिवस घेऊन येवो आपल्या जीवनात आनंदाची लाट
   असाच जन्मोजन्मी वाढत राहो आपला थाट
   तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  5. तुझ्या आयुष्यातील हा सुंदर क्षण,
   पुन्हा पुन्हा येवो
   आणि प्रत्येक वेळी
   आपण तुझा वाढदिवस साजरा करत राहो!
   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  6. तुझ्या वाटेतील प्रत्येक
   दगड फुल बनू दे!
   तुझ्यावर सुखाची बरसात होऊ दे !!
   मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. तुझे जीवन फुलांसारखे
   सुगंधित होवो,
   प्रत्येक आनंद तुझ्या
   चरणांचे चुंबन घेवो,
   देवाकडे एकच मागणी
   माझा मित्र सुखाचा सोबती होवो!
   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…
  8. चंद्रापेक्षा प्रिय चांदणे,
   चांदण्यापेक्षा गोड रात्र,
   रात्री पेक्षा सुंदर जीवन,
   आणि जीवनापेक्षा प्रिय माझी सखी!
   तुला जन्मदिनाच्या शुभेच्छा गं!
  9. वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस
   आठवड्याचे ७ दिवस
   आणि माझ्या आवडीचा १ दिवस
   तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस
   भावा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  10. कोणाच्या तालावर नाही जगत
   स्वतःच्या ऐटीवर जगतो
   अशा दिलदार मित्राला
   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  हेही पहा –

  Join Our WhatsApp Community
  Get The Latest News!
  Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.